Ticker

6/recent/ticker-posts

किल्ले गोवळकोट (रत्नागिरी)

 किल्ले गोवळकोट (रत्नागिरी)


चिपळूण शहरात वाशिष्ठी नदीच्या काठावरील एका टेकडीवर गोवळकोट उर्फ गोविंदगड हा किल्ला आहे. या किल्ल्याच्या तीन बाजूंनी वाशिष्ठी नदीचे नैसर्गिक संरक्षण आहे, तर उरलेल्या बाजूला खंदक खोदून किल्ला बळकट केला होता. आज हा खंदक बुजलेला आहे.चिपळूण हे प्राचिनकाळात बंदर म्हणून प्रसिध्द होते. या बंदराच्या संरक्षणासाठी गोवळकोटची उभारणी करण्यात आली होती.

किल्ल्याचा प्रकार गिरीदुर्ग

किल्ल्याची ऊंची : १५० मीटर  

डोंगररांग : रत्नागिरी , कोकण 

जिल्हा : रत्नागिरी 

श्रेणी : मध्यम 


गडावर जाण्याच्या वाटा: चिपळूण शहरापासून २ कि.मी वर असलेल्या या किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत म्हणजे करंजेश्वरी देवीच्या मंदिरापर्यंत रिक्षा मिळतात. मंदिरामागील पायर्‍यांच्या मार्गाने १५ मिनीटात गडावर जाता येते.

राहण्याची सोय : गडावर राहण्याची सोय नाही 

जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही 

पाण्याची सोय : गडावर पाण्याची सोय नाही 

पायथ्याचे गाव: चिपळूण 

वैशिष्ट्य : करंजेश्वर देवीचे मंदिर बघण्याजोगे आहे 

Post a Comment

0 Comments